Home संगमनेर संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Breaking News | Sangamner Crime: दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून  त्यांच्याकडून ५ लाख ६९ हजार २३१ जगाराचे रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्यही जप्त.

Police raid gambling den in Sangamner

संगमनेर: संगमनेरात गोल्डन सिटी परिसर काटवनात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर संगमनेर शहर पोलिसांनी शनिवारी (ता. १३) छापा टाकत कारवाई केली आहे.  या कारवाईत शहरासह ग्रामीण भागातील दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून  त्यांच्याकडून ५ लाख ६९ हजार २३१ जगाराचे रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

शनिवारी दुपारी ३.३० बाजेच्या सुमारास गोल्डन सिटी परिसरातील बुबासाहेब नवले नगर भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत सध्या शहराचा प्रभार असलेल्या तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक ढुमणे यांनी फौजफाट्यासह सदर ठिकाणी छापा घातला असता संगमनेरात सर्वात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे समोर आले.

या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल

पोलिसांनी दीपक किसन अरगडे (वय ४२, रा. सिद्धिविनायक सुपर मार्केटच्या मागे, मालदाड रोड) याच्या ताब्यातून २० हजार २८६ रुपयांचा, भगवान खंडू रहाणे (वय ५६ वर्ष, रा. लक्ष्मीनगर) याच्या ताब्यातून १० हजार १०० रुपयांचा, मंगेश लक्ष्मण सातपुते (वय ४१, रा. पावबाकी रोड) याच्या ताब्यातून १२ हजार १८० रुपयांचा, जितेंद्र संभाजी दवे (वय ४९, रा. साईनगर) याच्या ताब्यातून २ हजार २०० रुपयांचा, प्रवीण उर्फ भाऊ बाळूसिंग चव्हाण (वय ५०, रा. चव्हाणपुरा) याच्या ताब्यातून ५ हजार ३३५ रुपयांचा, बाळासाहेब शिवराम अरगडे (वय ४३, रा. रहाणे आखाडा, गुंजाळवाडी) याच्या ताब्यातून ३० हजार २८० रुपयांचा, चेतन दिलीप ठाकूर (वय २८, रा. पार्श्वनाथ गल्ली) याच्या ताब्यातून १२ हजार एकशे सत्तर रुपयांचा, शैलेश त्रिंबकराव देशमुख (वय ४६, रा. वकील मळा, धांदरफळ बु.) याच्या ताब्यातून १५ हजार २७० रुपयांचा, हरीश दिलीप देशमुख (वय ४१, रा. जवळे कडलग) याच्या ताब्यातून १५ हजार २३० रुपयांचा, शेटीबा दामू पवार (बय ५२, रा. रामनगर, झोपडपट्टी) याच्याकडून ९ हजार १८० रुपयांचा असा एकूण ५ लाख ६९ हजार २३९ रुपयांचा मुद्देमाल व तिरट नावाचा जुगार खेळासाठी बापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बरील दहा जुगाऱ्यांवर मुंबई जुगार कायद्याचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे करत आहेत.  या कारवाईने जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Police raid gambling den in Sangamner

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here