Home उस्मानाबाद Raid: पोलिसांचे तीन लॉजवर छापे, वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

Raid: पोलिसांचे तीन लॉजवर छापे, वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

Raid On prostitution business: कारवाईत 13 जणाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायदा 1956 नुसार गुन्हा दाखल करून पीडित महिलांची सुटका.

Police raid three lodges, bust prostitution business

उस्मानाबाद : तीन लॉजवर पोलिसांच्या तीन स्वतंत्र पथकाने सोमवारी (ता. 21) रात्री धाडी टाकून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत 13 जणाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायदा 1956 नुसार गुन्हा दाखल करून पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळव उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्याविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उमरगा शहरात गेले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,  उमरगा येथील हर्ष लॉज, सुहाणा लॉज आणि अभिराज हॉटेल या तीन हॉटेल- लॉजचे चालक, मालक हॉटेलमध्ये काही महिलाद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. यावर पथकाने सदर माहिती पोलिस अधीक्षकांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, उमरगा पो.ठा. चे पोनि मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोनि के. एस. पटेल, पोउपनि – चाटे यासह पोलिस अमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तीन वेगवेगळे पथक तयार करून 21 नोव्हेंबर रोजी 23.00 ते 01.00 वा. दरम्यान नमूद तीन्ही ठिकाणी छापे टाकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर चौरस्ता येथील दोन तर उमरगा शहरातील आरोग्यनगरीतील एक. अशा तीन लॉजवर पोलिसांच्या तीन स्वतंत्र पथकाने सोमवार (ता. 21) रोजी रात्री धाडी टाकून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला आहे. या मध्ये जकेकुर येथील एका लॉजवर छापा पडताच लॉजचे मालक, व्यवस्थापक, कर्मचारी फरार झाले. या कारवाईत 13 जणाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायदा 1956 नुसार गुन्हा दाखल करून पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशानुसार कळंबचे सहाय्यक पोलिस अधिक्षक एम.रमेश यांना विविध लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावर सोमवारी उमस्या पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाईसाठी तीन पथक तयार केले, उमरगा शहरातील आरोग्यनगर येथील सुहाना लॉजवरील कारवाईत पाडुरंग महादेव गायकवाड (रा. जकेकुर, ता. उमरगा), शंकर अनिल बिराजदार (रा. संभाजीनगर, उमरगा), अँटोरिक्षा चालक नवनाथ मारुती पुरी (रा. पतंगे रोड, उमरगा), लॉज मालक मुजाहीद बागवान (रा. गुलबर्गा) यानी संगनमत करून स्वःताच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पीडित महिलाद्वारे लॉजवर वेश्या व्यवसाय चालवीत होते.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी फिर्याद दिली असुन उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते तपास करीत आहेत. जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल अभिराज लॉज येथील कारवाईत सुर्यकांत सिध्द्धारूढ मसुदे (रा. शरणनगर, ता. आळंद), श्रीशैल्य निजगुण जिवान (रा.डोण्णूर, ता.आनंद) यांनी पीडित महिलांना व्यभिचार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

जकुर चौरस्ता येथील हर्ष लॉगींग – येथील कारवाईत लॉजचे मालक तात्याराव धनाजी कोतमाळे (रा. हाळवाई, जि. बिदर), लॉजचे व्यवस्थापक दिगंबर पात्रे (रा.आनंद), संजय शिवाजी बनसोडे (रा. जके कुरवाडी, ता. उमरगा) यांच्यावर कारवाई करत ग्राहक सुभाष दिगंबर वाळके, निळकंठ संभाजी तेली (रा. दोघेही धानुरी, ता. लोहारा शाहुराज आण्णाराव मुळे, अनिल रमेश मुळे (रा. दोघेही अणदूर, तुळजापुर यांच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी श्रीकांत भोगे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक एम.रमेश हे करीत आहेत.

Web Title: Police raid three lodges, bust prostitution business

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here