Home Accident News Accident: टेम्पो दुचाकी अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू

Accident: टेम्पो दुचाकी अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू

Newasa accident News: अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू , सासरे जखमी. 

Pregnant woman dies in a tempo bike accident

नेवासा: नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे नेवासा शेवगाव रस्त्यावर टेम्पो व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. या अपघातात रोहिणी गर्जे वय १९ रा. वडुले या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहिणी गर्जे या आपल्या सासऱ्या सोबत कुकाणा येथे दवाखान्यात गेल्या होत्या. कुकाण्यातून मोटारसायकल वरून घरी जात असताना चिलेखनवाडी गावा जवळ नेवासा-शेवगाव रस्त्यावर  सदर मोटारसायकलला पाठीमागून आलेल्या एम एच ०४-डी के – ८१९१ या ४०७ टेम्पोची मोटरसायकलला जोराची धडक लागून झालेल्या अपघातात वडूले येथील १९ वर्षीय गर्भवती महीला रोहिणी गणेश गर्जे ही जागीच ठार झाली असून तीचे सासरे रामदास हरिभाऊ गर्जे हे जखमी झाले आहेत.

या  घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार नितीन भताने, तुकाराम खेडकर व पो. कॉ. अमोल साळवे हे घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर वडुले येथे रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात असून याबाबत रामदास हरिभाऊ गर्जे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून टेम्पो चालक नामे परमेश्वर हाऊसराव आमले रा.आंभोरा, ता.आष्टी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pregnant woman dies in a tempo bike accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here