Home अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

president of Swabhimani Shetkari Sanghatana, were crime with molestation

राहुरी |  Rahuri Crime: राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामसभेत अन्य महापुरूषांचे स्मारक व्हावे, असा मांडताना महिलेचा विनयभंग (molestation) करून तिला मारहाण केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रवींद्र बापूराव मोरे, सचिन भाऊसाहेब कर्पे, सुरेश ज्ञानदेव तोडमल, उमेश रावसाहेब कवाणे, बाळासाहेब शिंदे यांच्या विरोधात विनयभंग (molestation) व मारहाणीचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.2 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास टाकळीमिया गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ग्रामसभा असल्याने त्याठिकाणी गावची नागरिक नात्याने गेले होते. त्या ठिकाणी ग्रामसभेत शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, यास आमची देखील संमती असून त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतीबा फुले यांचे देखील स्मारक व्हावे, असा मुद्दा मांडत असताना रवींद्र बापूराव मोरे यास मी मांडलेल्या मुद्याचा राग आल्याने त्याने भरसभेत माझ्या अंगावर येऊन माझी गचांडी धरून मला शिवीगाळ करण्यास सुरूवात करून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य  केले.

तसेच तेथील उपस्थित असलेल्या सचिन भाऊसाहेब करपे याने उर्मट भाषा वापरून माझ्या डोक्यात चापट मारली. सुरेश ज्ञानदेव तोडमल याने माझ्या पाठीत चापट मारली. तर उमेश रावसाहेब कवाणे, बाळासाहेब शिंदे (सर्व रा. टाकळीमिया ता.राहुरी) यांनी हात धरुन मला ओढून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून तू पुन्हा आमच्या नादी लागलीस तर तुझा काटा काढू, अशी धमकी दिली. त्यावेळी रवी मोरे यांनी माझ्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण ओढल्याने गहाळ झाले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: president of Swabhimani Shetkari Sanghatana, were crime with molestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here