Home क्राईम निर्मात्याला पत्नीने मॉडेलसोबत रंगेहाथ पकडले, निर्मात्याने पत्नीवर चढवली गाडी…

निर्मात्याला पत्नीने मॉडेलसोबत रंगेहाथ पकडले, निर्मात्याने पत्नीवर चढवली गाडी…

Model:  मॉडेलसोबत रोमान्स, पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले, निर्माता कमल किशोर मिश्रा.

Producer's wife catches him red-handed with model

मुंबई:  चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता, जेव्हा पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले तेव्हा मिश्राने आपल्या पत्नीला कारने धडक दिली. इतकेच नाही तर मिश्राने पत्नीवर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला. यात मिश्रा याची बायको यास्मिन वाचली असून त्या जखमी झाल्या आहेत.

दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिममध्ये १९ ऑक्टोबर रोजी कमल किशोर मिश्रा हा चित्रपट निर्माता आपल्या कारमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता. तेव्हा कमल किशोर मिश्रा याची पत्नी यास्मिन तिकडे दाखल झाली. त्यांनी गाडीच्या काचेवर नॉक करून पतील मिश्राला आपल्याला आताच्या आता बोलायचे आहे म्हणून सांगितले. परंतु मिश्रा गाडीतून बाहेर येत नव्हता. तेव्हा मिश्राने गाडी सुरू केली आणि पत्नी यास्मिनला धडक दिली. या यास्मिन जखमी झाल्या आणि त्या खाली कोसळल्या. त्यानंतर मिश्राने पत्नी यास्मिनवर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे.

मिश्राच्या पत्नी यास्मिन यांनी आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीही यास्मिन याच्या तक्रारीची दखल घेत कमल कुमार मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कमल किशोर मिश्रा याने ‘शर्मा जी की लग गई’, ‘देहाती डिस्को’, ‘खली बली’ या चित्रपटांची निर्मिती केली होती. मिश्रा आणि यास्मिन यांचे ९ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यास्मिन या टीव्ही अभिनेत्री आहेत.

Web Title: Producer’s wife catches him red-handed with model

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here