Home नाशिक प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार सेवापुर्ती, कृतज्ञता व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा थाटात...

प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार सेवापुर्ती, कृतज्ञता व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

Nashik: सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी येथे लायब्ररी सायन्स विभागात कार्यरत असणारे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार यांची औपाचारिक सेवापुर्ती सोहळा (Ceremony). 

Prof. Dr. Rajendra Kumbhar Sevapurti, Gratitude and Gaurav Granth Publication Ceremony 

नाशिक: सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी येथे लायब्ररी सायन्स विभागात कार्यरत असणारे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार यांची औपाचारिक सेवापुर्ती गेल्या महिन्यात झाली. सरांनी त्यांच्या कारकिर्दीत विभागासाठी, प्रोफेशनसाठी, सहयोगीसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी निस्वार्थी कार्यतत्पर राहून दिलेल्या विलक्षण योगदानासाठी नासिक विभागातर्फे त्यांच्या सेवापुर्ती समारंभाचे भव्य असे आयोजन त्यांचे सहयोगी तथा असंख्य विद्यार्थी, सर्वांनी मिळून दिनांक १८ जून २०२३ रोजी करण्यात आले होते. या समारंभसाठी संपूर्ण महाराष्ट्र तथा महाराष्ट्राबाहेरील लायब्ररी सायन्स प्रोफेशनलसनी स्वलिखत लेख पाठवले होते आणि त्याचा वाचनसंस्कृतीचे महामेरू डॉक्टर राजेंद्र कुंभार ह्या नावाने आदरयुक्त गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठ नुकतेच सेवानिवृत्त झालेले तथा आय एल ए व मुकला ह्या लायब्ररी सायन्स चळवळीचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे उपस्थित होते. गौरव ग्रंथ प्रकाशन तथा डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचा सन्मान स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजी नगर माजी अध्यक्षा नौलेज रिसॉर्स सेंटर, प्राध्यापक डॉ. अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. धर्मराज वीर, डायरेक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजी नगर डॉ. नंदकुमार दहिभाते, एन सी एल पुणे, डॉ. सी. आर. करिसिदप्पा, धारवाड युनिव्हर्सिटी प्रमुख अतिथी, माजी लायब्ररी सायन्स विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, प्राध्यापक एस के पाटील, प्राध्यापक रूपन सिंग, माजी लायब्ररी सायन्स विभाग व उप प्राचार्य, एच पी टी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, डॉ. मधुकर शेवाळे, उप ग्रंथपाल, प्राध्यापक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, सौं. सुरेखा राजेंद्र कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

गौरव ग्रंथासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील सुमारे ८० लेख प्राप्त झाले असून तो ग्रंथ भविष्यात वाचकांना प्रेरणादायी असणारा आहे.

डॉ. राजेंद्र कुंभार यांचे कार्य हे अखंड राहावे यासाठी rmknet  ह्या ब्लॉग वाहिनीचा प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्यातील काही निवडक छायाचित्रांची चित्रफित कार्यक्रमात दाखवण्यात आली.

कार्यक्रमासाठी बहू संख्येने महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील लायब्ररी सायन्स प्रोफेशनल, सरांचे विद्यार्थी उपस्थित होते, विद्यार्थ्यांच्या वतीने सरांना अप्रतिम अशी गणेश मूर्ती भेट देण्यात आली. मानपत्राचे वाचन डॉ. विजय रहाणे, ग्रंथपाल बी टेक महाविद्यालय एम ई टी नाशिक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता डॉ. संभाजी पाटील, ग्रंथपाल एम ई टी इंजिनीरिंग महाविद्यालय नाशिक प्राध्यापक लायब्ररी सायन्स विभाग, मुक्त विद्यापीठ – आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाचे निवेदन श्री गांगुर्डे व सौं यामिनी गालापुरे यांनी केले. समस्त आयोजक समितीच्या अथक परिश्रमातून सेवापुर्ती समारंभ उत्कृष्ट संपन्न झाला.

Web Title: Prof. Dr. Rajendra Kumbhar Sevapurti, Gratitude and Gaurav Granth Publication Ceremony 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here