Home क्राईम धक्कादायक! ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकली प्राध्यापिका

धक्कादायक! ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकली प्राध्यापिका

Pune Crime: ( trap of ‘sextortion’) विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला व्हॉट्सअॅप कॉल करून विद्यापीठात बदनामी करण्याची भीती घालून त्यांचा अश्लील व्हिडीओ काढला. तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी. 

Professor Caught in the Trap of 'Sextortion'

पुणे : विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला व्हॉट्सअॅप कॉल करून विद्यापीठात बदनामी करण्याची भीती घालून त्यांचा अश्लील व्हिडीओ काढला. तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन केल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयांक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल केला. मांजरी येथील एका प्राध्यापिकेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार मार्च २०२० पासून आतापर्यंत सुरू होता.

इन्स्टाग्राम व त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल करून मी सांगतो तसे तुम्ही केले नाही तर मी तुमची विद्यापीठात ‘बदनामी करेल’, अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ कॉल इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर दुसऱ्या आयडीवरून फिर्यादी यांना अनेक ऑडिओ व व्हिडीओ कॉल केले. आणखी एका इन्स्टाग्राम आयडीवरून फिर्यादी व त्यांच्या पतीला फिर्यादीचे न्यूड व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे न्यूड व्हिडीओ सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली.

Web Title: Professor Caught in the Trap of ‘Sextortion’

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here