एकतर्फी प्रेमातून बहिणीला वारंवार करत होता प्रपोज, भावाने केली तरुणाची हत्या
Nashik Crime News: बहिणीला वारंवार प्रपोज करत लग्नासाठी तगादा लावत असल्याचा राग मनात धरून भावाने एका तरुणाची हत्या (Murder) केल्याची घटना.
नाशिक: मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला वारंवार प्रपोज करत लग्नासाठी तगादा लावत असल्याचा राग मनात धरून भावाने एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या आरोपीने त्याचा मामा आणि जावयाच्या मदतीने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील निलगिरी बाग परिसर एका हत्येच्या घटनेमुळे सध्या हादरून गेला आहे. विकास नलावडे या 25 वर्षीय तरुणाला मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करत त्याला जीवे ठार मारण्यात आले आहे. हे सगळं काही घडलं आहे ते एकतर्फी प्रेमातून. विकासचे त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. यासाठी तो वारंवार तिचा पाठलागही करायचा, अनेक वेळा त्याने तिला प्रपोज करत लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र संबंधित तरुणी यासाठी तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी विकासची समजूत देखील घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विकास काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हाच राग मनात धरत अपार्टमेंटच्या समोरच असलेल्या मैदानात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुलीचा भाऊ अमोल साळवे, मामा सुनील मोरे आणि जावई राहुल उजगीरे यांनी विकासला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तसेच धारधार शस्त्राने वार करत त्याचा खून केला.
यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचा भाऊ अमोल आणि मामा सुनील मोरेला अटक केली आहे. तर जावई राहुल उजगिरे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तिघांवर आडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: proposing to his sister out of one-sided love, the brother Murder the young man
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App