Home उस्मानाबाद खळबळजनक: लॉजवर सुरु होता भलताच प्रकार, छाप्यात ५ महिलांची सुटका

खळबळजनक: लॉजवर सुरु होता भलताच प्रकार, छाप्यात ५ महिलांची सुटका

Police raid Lodge:  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देहविक्रयाशी (Prostitution Business) संबंधित रॅकेट उघड केल्याने खळबळ उडाली.

Prostitution Business started at the lodge, 5 women were rescued in the raid

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देहविक्रयाशी संबंधित रॅकेट उघड केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत संबंधित लॉजचे मालक आणि चालकांना ताब्यात घेतले आहे. तसेच या लॉजवर देहविक्रयासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार दिलीप जगदाळे, अश्विन जाधव, अमोल निंबाळकर, विजय घुगे, शौकत पठाण, वैशाली सोनवणे, रंजना होळकर, बलदेव ठाकुर, कोळी यांच्या पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी गस्तीस होते. गस्तीदरम्यान पथक उस्मानाबाद शहरात असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उस्मानाबाद शहरातील तुळजापूर बायपास रस्त्यालगत असलेल्या मयुर पॅलेस हॉटेल आणि लॉजचे चालक- मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर ४.४५ च्या सुमारास छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॉजच्या खोल्यांमध्ये ५ महिला (नाव- गाव गोपनीय) आढळून आल्या. महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक- मालक दोन पुरुष असून (नाव, गाव गोपनीय) ते त्या ५ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगिक स्वैराचाराकरिता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिविका करीत असल्याचे समजले.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

यावर पथकाने त्या लॉज चालक- मालक दोन्ही पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन व १ हजार रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या पाचही महिलांची सुटका करुन लॉज चालक- मालक दोन पुरुषांविरुध्द २६ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Prostitution Business started at the lodge, 5 women were rescued in the raid

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here