Home क्राईम उच्चभ्रू वस्तीत दोन तरुणींच्या सहाय्याने वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा अन….

उच्चभ्रू वस्तीत दोन तरुणींच्या सहाय्याने वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा अन….

Prostitution: उच्चभ्रू वस्तीत दोन तरुणींच्या सहाय्याने वेश्याव्यवसाय पर्दाफाश करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. छाप्यात दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

Prostitution with the help of two young women in an elite locality, police raid

रत्नागिरी: शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या साहाय्याने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. वेश्याव्यवसाय चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी (२० जुलै) दुपारी २:२० वाजता करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राजेंद्र रमाकांत चव्हाण (४५, मिरजोळे, जांभूळफाटा, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या छाप्यात दोन तरुणींनाही ताब्यात घेतले आहे.

राजेंद्र चव्हाण हा बिहार येथील २३ वर्षीय आणि ठाणे येथील २४ वर्षीय तरुणींचा वापर करुन शिवाजीनगर परिसरातील एका सदनिकेत वेश्याव्यवसाय चालवत होता. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो आपली उपजीविका चालवत होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी सदनिकेवर छापा टाकून दोन तरुणींसह त्याला ताब्यात घेतले. या ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उच्चभ्रू वस्तीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक  तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Prostitution with the help of two young women in an elite locality, police raid

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here