Home क्राईम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने केला महिलेवर बलात्कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने केला महिलेवर बलात्कार

Pune Woman rape by son of NCP corporator

पुणे | Pune Rape Case: पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मुंढवा गाव येथे हा प्रकार घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. आरोपी समीर गायकवाड याचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या एकट्या घरात होत्या,  त्यावेळेस आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कमरेला पकडले आणि जबरदस्ती करू लागला. तेव्हा त्यांनी विरोध केल्यावर मुलांना व पतीस मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार (Sexual Assault)  केला. या प्रकारानंतर फिर्यादी एकदम घाबरुन गेल्या, त्यानंतरही त्याने फिर्यादी यांचे तोंड पकडले व खाली पाडले. त्यांच्यावर जबरदस्ती करु लागला या कृत्याला त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवर्‍याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे परिवार संपवून टाकीन, अशी धमकी देऊ लागला.

या धमकीमुळे त्यांनी कोणाला हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर (ता. 17 डिसेंबर 2021) रोजी दुपारी 2 वाजता समीर गायकवाड याने फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी देत तेथून देऊन निघून गेला. या प्रकारानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (Rape Crime) दाखल केला आहे.

Web Title: Pune Woman rape by son of NCP corporator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here