Home क्राईम तरुणाने आईला औषधांचा ओव्हरडोस देत खून, नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाने आईला औषधांचा ओव्हरडोस देत खून, नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या

Pune young man murdered his mother by giving her an overdose of drugs, then committed suicide

Pune Crime:  शहरातील धनकवडी परिसरातील सहकारनगर परिसरात 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून केला खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. गणेश मनोहर फरताडे (वय 42) तरुणाचे नाव आहे.  निर्मला मनोहर फरताडे असे त्याच्या आईचे नाव आहे. या घटनेने सहकारनगर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सहकारनगरमध्ये मयत आरोपी गणेश मनोहर फरताडे (वय 42) आपल्या आईसोबत राहत होता. गणेश बेरोजगार होता. त्याला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला कंटाळून स्वतः आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यापूर्वी आईला औषधांचा ओव्हरडोस दिला त्यानंतर आई निपचित पडली. त्यानंतर तिच्या चेहरा प्लॅस्टिकची पिशवी घालून दोऱ्याने पिशवीला गुंडाळून खून केला. घटनेची माहिती मिळताच सहकार पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली. या प्रकरणी मयत गणेशाची मावस बहीण हिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गणेश हा व्यवसायाने इंजिनिअर होता. त्याचा आई आजारी होती. तिच्या आजारपणामुळे औषधांचा खर्च खूप होत होता यामुळे तो त्रस्त होता. त्यातच त्याला नोकरी नव्हती. आजारपण, कर्जामुळे नैराश्यात गेलेल्या याने टोकाचे पाउल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सहकार पोलीस स्थानाकाचे पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pune young man murdered his mother by giving her an overdose of drugs, then committed suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here