Home अहमदनगर नगर जिल्ह्यातील या तालुक्यात ३० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

नगर जिल्ह्यातील या तालुक्यात ३० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

Rahata 30 acres of sugarcane are on fire

Ahmednagar | Rahata | राहता: राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील चारी क्र. 15 व हनुमंतगाव रस्त्यालगतचा 30 एकरांहून अधिक ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.  या आगी मागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

तोडणीला आलेल्या उभ्या उसाच्या पिकाला गुरुवारी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे लोळ आणि प्रचंड धूर वाऱ्यावर पसरत होता. हे चित्र दिसू लागल्याने आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी धावाधाव सुरू केली. त्यातच जोराचे वारे वाहत असल्याने आगीला इतरत्र पसरण्यास मदत झाल्याने चारी क्र. 15 भागातील विखे वस्तीवरून आगीला सुरुवात झाली. वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने आग लोणी-हनुमंतगाव रस्त्यालगतच्या भागाकडे वेगाने पसरू लागली.

जागरूक शेतकर्‍यांनी विखे पाटील साखर कारखान्यावर माहिती देऊन अग्निशमन दलास माहिती दिली  विखे, गणेश, राहुरी कारखान्याबरोबरच राहाता नगरपालिकेची अग्निशामक घटनास्थळी आल्या. अरुंद रस्ते आणि जेथे आग लागली होती तिथे जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. स्थानिक शेतकरी, शेतमजूर यांनी शक्य होईल तेवढे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर चार-पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. विखे कारखान्याने जळालेल्या उसाची तातडीने तोडणी करण्यासाठी खास व्यवस्था केली असून लवकरात लवकर ऊस गाळपासाठी नेण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Rahata 30 acres of sugarcane are on fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here