अहमदनगर: टँकरने दुचाकी स्वाराला चिरडल्याने एक जण जागीच ठार
Ahmednagar News Live | Rahata | राहाता: राहता तालुक्यातील साकुरी शिवारातील पुलाजवळ एका दुचाकी स्वाराला पेट्रोलच्या टँकरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
चाँद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी यांचा या अपघातात (Accident) जागीच मृत्यू झाला. चाँद लतिफ शेख हे साबणाचे मोठे व्यापारी असल्याचे समजते.
प्रत्यक्षदर्शीकडुन मिळालेल्या माहितीनुसार साकुरी पुलाजवळ राहाता शहराच्या दिशेने हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवर जाणारे चाँद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी हे चालले असताना नगरच्या दिशेने जाणार्या एचपी कंपनीचा पेट्रोल टँकर क्रमांक एम एच 17 टी 2490 च्या मागील टायरच्या खाली आल्याने जागीच ठार झाला. अवजड टँकरने चिरडल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. स्थानिकांनी तात्काळ राहाता पोलीस स्टेशनला माहिती कळवल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक कल्याण काळे, पोलीस हवालदार सुधाकर काळोखे तसेच पोलीस हवालदार डी. डी तुपे, पोलिस कॉ. अनिल गवांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करून रुग्णवाहिकेस पाचारण केले.स्थानिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून शिर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आला.
Web Title: Rahata Accident One person was killed on the spot when a tanker crushed a two-wheeler