Home अहमदनगर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न

Rahata Attempted to kill his wife with an ax

राहता: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील नपावाडी येथे घडली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.  

तालुक्यातील नपावाडी येथे विठ्ठल बोर्डे यांच्या शेतातील झोपडीत शनिवारी पहाटे पती विष्णू सोनाव्मे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस पाटील योगिता धनवटे यांच्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी आरोपी विष्णू जगन्नाथ सोनावणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नी पूजा विष्णू सोनावणे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती विष्णू सोनवणे याने कुऱ्हाडीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शिर्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुभाष भोये हे करीत आहेत.

Web Title: Rahata Attempted to kill his wife with an ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here