Home अहमदनगर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलाचा अंत

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलाचा अंत

Rahata boy killed in attack by stray dogs

राहता | Rahata: राहता तालूक्यातीळ ममदापूर येथील एका दीड वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. जाहेद अरबाज शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, मुलगा आईसोबत ममदापूर ळा आला होता. रविवारी सायंकाळी सहा वाजता जावेद हा घरासमोर खेळत होता. अचानक भटक्या कुत्र्यांचे टोळके मुलाकडे धाव घेत आले. त्याला काही अंतरावर ओढत नेऊन त्याच्यवर प्राणघातक हल्ला केला.

यावेळी नागरिकांनी व घरातील महिलांनी कुत्र्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला मात्र हिंसक टोळक्याच्या आक्रमकतेमुळे त्यांचे काही चालले नाही. या घटनेनंतर जावेदला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ताबोडतोब हलविण्यात आले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने दीड तासांच्या उपचारानंतर मुलाची प्राणज्योत मालविली.

या भागांत या अगोदर ही भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याचे घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.

Web Title: Rahata boy killed in attack by stray dogs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here