Home अहमदनगर मुख्याधिकाऱ्यांना तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

मुख्याधिकाऱ्यांना तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

Rahata Crime Youth abuse and pushback to the chief minister

Ahmednagar News Live | Rahata Crime | राहता: जिल्ह्यात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांचे पालन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश व कोरोना सुसंगत वर्तन नियमांची अंमलबजावणी करत असताना गर्दी करू नका येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने तरुणांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी राहाता (Rahata) पोलिसात पोपट रघुनाथ जाधव, निसार सय्यद ऊर्फ राज्जु भाई, सिद्धार्थ वाघमारे या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे पालन व्हावे, यासाठी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास राहाता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात गस्त घालत असताना राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या हर्षल मेन्स पार्लर येथे गर्दी दिसल्याने मी राहाता नगर परिषदेचा मुख्याधिकारी आहे, असे सांगून इथे गर्दी करू नका तसेच सदरचे दुकान बंद करण्यास सांगितले असता

यावेळी सदर व्यक्तींना माझ्या सांगण्याचा राग आला. त्यानंतर त्यांनी आम्ही इथून जाणार नाही तुला काय करायचे ते कर, असे सांगत तिघांनी यांनी गोंधळ घालून मला धक्काबुक्की केली. अशी फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी येत असल्याचे समजताच हे तिघे जण पसार झाले.

Web Title: Rahata Crime Youth abuse and pushback to the chief minister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here