Home अहमदनगर ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

Ahmednagar News: Gram Panchayat Election Result: राहात्यातील १२ पैकी ३ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर! ९ ठिकाणी विखे गट, तीन ठिकाणी कोल्हे गटाला सत्ता.

Rahata Gram Panchayat Election Result

शिर्डी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी एन्ट्री करून तीन ग्रामपंचायती खेचून विखेंना ‘जोर का झटका’ दिलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील कोपरगाव मतदासंघात असलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाचं गाव पुणतांबा ग्रामपंचायतीमध्ये देखील भाजप विखे पाटील गटाला मोठा धक्का देत भाजपच्या कोल्हे गटाने विजय संपादित केलाय. राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीपैकी ०९ ग्रामपंचायत भाजप विखे गट तर ३ ग्रामपंचायतीत विखे पाटलांची सत्ता संपुष्टात आणत कोल्हे गटाने विजय मिळवत गणेश कारखाना निवडणुकीपासून आपला विजयाचा करिश्मा कायम ठेवलाय.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी आणि चितळी या तीन ग्रामपंचायतीत भाजपचे विवेक कोल्हे यांचे पॅनल निवडून आले आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यात भाजपचे विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी आघाडी करत विखे पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर आता तीन ग्रामपंचायती कोल्हेंनी आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. या तीनही ग्रामपंचायती कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील असून त्यांचा राहाता तालुक्यात समावेश आहे.

तालुक्यातील वाकडीत सत्तांतर झाले असून कोल्हे गटाकडे सरपंचपद गेले आहे. १७ पैकी ७ जागा कोल्हे गटाला मिळाल्या असून काळे- विखे युतीला ८ जागा तर विखे प्रणित जनसेवा मंडळला २ जागा मिळाल्या आहे. धनगरवाडी सरपंचपदासह काळे विखे-गटाला ४ जागा तर विखे प्रणित गटाला ३ जागा मिळाल्या आहे. कोऱ्हाळेत जनसेवा विकास पॅनलला सरपंचपदासह २ जागा तर विखें प्रणित दाभाडे गटाला इतर जागा मिळाल्या आहे. निमगाव (को) ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी कैलास कातोरे निवडून आले असून गाडेकर यांचा पराभव झाला आहे. दहेगाव (को) विखे गटाची सत्ता आली असून पूनम संदीप डांगे या सरपंचपदी विजयी झाल्या आहे. चितळी सत्तांतर झाले असून सरपंचापदसह ८ जागा कोल्हे गटाला, काळे गटाला ४ जागा तर १ जागा विखे गटाला मिळाली आहे.

पिंपरी निर्मळमधील तिरंगी लढतीत विखे प्रणित जनसेवा मंडळाला सरपंचासह सह ७ जागा, विरोधी मधुकर निर्मळ गटाला ४ जागा तर बाळासाहेब थोरात गटाला ३ जागा मिळाल्या आहे. दरम्यान पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीत थोरात गटाने शिरकाव केला आहे. रुई ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाचे संदीप वाबळे यांनी सत्ता राखली असून सरपंचासह सह १२ जागा मिळवल्या आहे. तर विरोधी अभिजीत देशमुख गटाला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. पुणतांब्यात सत्तांतर झाले असून कोल्हे गटाला सरपंचपद मिळाले आहे. आडगाव खुर्द सरपंचपदाच्या पोटनिवडणूक विखे गटाचे माळी बाबासाहेब निवृत्ती विजयी झाले आहे. दुर्गापूर पोटनिवडणूकत विखे गटाचा सदस्य निवडून आला आहे.

Web Title: Rahata Gram Panchayat Election Result

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here