Home अहमदनगर अनैतिक संबंधाच्या संशयातून  मारहाण एक ठार तर एक जखमी

अनैतिक संबंधाच्या संशयातून  मारहाण एक ठार तर एक जखमी

Rahata One was killed in the incident

राहता | Rahata: अनैतिक संशय असल्याच्या कारणावरून सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील दोन तरुणांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत एक तरुण ठार तर एक जखमी झाला आहे.

ही घटना राहता न्यायालयाजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहरातील दोन सख्खे भाऊ व त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल सुभाष जेजुरकर वय २७ रा. नायगाव ता. सिन्नर असे या मयत तरुणाचे नाव आहे. शाम संजय जेजुरकर असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील दोन तरुण रविवारी सायंकाळी राहता येथे आले होते. राहुल जेजुरकर व राहता येथील प्रवीण बनकर यांच्यात जुने वाद होते. प्रवीण बनकर व संजय बनकर यांनी राहुल व त्याचा मित्र शाम यांना रविवारी सायंकाळी न्यायालायाच्या परिसरात पिंपळस शिवारात वाद हे परस्पर सोडविण्यासाठी बोलाविले होते. यांच्यात बाचाबाचीतून हाणामारी झाली. आरोपी बनकर बंधूनी व त्यांचे दोन अन्य मित्र यांच्या मदतीने राहुल व शाम यांना शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये राहुल जेजुरकर हा मृत्यू झाला तर शाम हा जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

शाम जेजुरकर याने राहता पोलिसांना फिर्याद दिली असून राहता पोलिसांनी प्रवीण बाळकृष्ण बनकर व भाऊ सचिन बाळकृष्ण बनकर व त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rahata One was killed in the incident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here