राहता: शरीर सुखाच्या मागणीसाठी चुलत सासऱ्यांचा सुनेवर प्राणघातक हल्ला.
शरीर सुखाच्या मागणीसाठी चुलत सासऱ्यांचा सुनेवर प्राणघातक हल्ला.
राहता: शरीर सुखाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून चुलत सासर्याने सुनेवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केला व त्यानंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना राहता तालुक्यातील केलवड गावात काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.
You May Also Like: Yeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies
याबाबत जखमी महिलेच्या पतीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, फिर्यादी स्वतः एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्याची मुले शाळेत गेली होती, तर पत्नी एकटीच घरी होती. साडे आकराच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरी आला. महिला घरी एकटी होती. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरीर सुखाची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून तिच्या चेहर्यावर मानेवर व हातावर धारदार शस्त्राने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. यापूर्वी तिला कुणी मारले असे पतीने विचारले असता तिने चुलत सासरा जबरदस्ती करू लागला व मी नकार दिला म्हणून माझ्यावर कुऱ्हाडीने वार केला असे सांगितले. त्यानंतर टी महिला बेशुद्ध पडली. या चुलत सासर्याने याआधीही अशी मागणी महिलेकडे केली होती. त्यानंतर महिलेच्या पतीने नातेवाईकांच्या मदतीने समजावून सांगितले होते. त्यावेळी आरोपीने महिलेच्या पतीला बायकोसोबत बोलू दिले नाही. तर तुम्हा दोघांना ठार मारून स्वतः आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. परंतु चुलते असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली नव्हती. असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा