Home अहमदनगर अहमदनगर: पाच वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर: पाच वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Rahuri Attempt to kill a five-year-old girl by inhumane treatment

राहुरी  | Rahuri: राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  एका ५ वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेत तिच्यावर अमानुष अत्याचार (inhumane treatment) करून तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  किशोर उर्फ केश्या विजय पवार रा. आरडगाव ता. राहुरी असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, रा. आरडगाव, ता. राहुरी याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 18 जून रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान त्या 5 वर्षीय बालिकेचे आई, वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी किशोर उर्फ केश्या विजय पवार, रा. आरडगाव, ता. राहुरी याने त्या बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. काही अंतरावर असलेल्या नारळाच्या झाडाजवळील शेताचे बांधाजवळ त्याने त्या बालिकेवर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर तिचा कापडाच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब त्याला जागेवरच पकडून आरडाओरड केली. पीडित बालिकेचे वडील येत असल्याचे पाहून त्याने पीडित बालिकेच्या आईला ढकलून घटनास्थळावरून तो पसार झाला. दैव बलवत्तर म्हणून त्या बालिकेचा जीव वाचला. पीडित बालिकेला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नार्‍हेडा आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Web Title: Rahuri Attempt to kill a five-year-old girl by inhumane treatment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here