Home अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय

जिल्ह्यातील या तालुक्यात नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय

Rahuri finding dead body in river basin

Ahmednagar News Live | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील म्हैसगाव हद्दीत आग्रेवाडी परिसरात मुळा नदीपात्रात पुरुष जातीचा मुतदेह (Dead body)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार दि 22 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी-तास पुलालगत मुळा नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुतदेह बाहेर काढण्यात आला असुन राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह राहुरी येथे नेण्यात आला असून अधिक तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

Web Title: Rahuri finding dead body in river basin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here