Home अहमदनगर राहत्या घरापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ

राहत्या घरापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Rahuri Found of a Dead body some distance from the residence

राहुरी | Rahuri: राहत्या घरापासून काही अंतरावर मृतदेह (Dead body)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून परत आलेल्या विठ्ठल रावजी शेलार (वय ५५, रा. गवतेवाडी, वांबोरी) यांचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आला.

विठ्ठल शेलार हे जागरण गोंधळ कार्यक्रमास गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर ते जखमी अवस्थेत आढळून आले.

नातेवाईकांनी त्यांना वांबोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली.

रविवारी वांबोरी येथे शवविच्छेदनानंतर विठ्ठल शेलार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर शेलार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा उलगडा होणार आहे. अधिक तपास वांबोरी पोलिस करीत आहेत.

Web Title: Rahuri Found of a Dead body some distance from the residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here