Home अहमदनगर Theft: घरावर चोरट्यांचा दरोडा: मारहाणीत एक जण जखमी, ऐवज चोरीस

Theft: घरावर चोरट्यांचा दरोडा: मारहाणीत एक जण जखमी, ऐवज चोरीस

Rahuri Theft Home burglary one injured

राहुरी | Theft: राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी चेड्गाव रस्त्यावरील तरवडे वस्तूवर गुरुवारी मध्यरात्री दोन चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात घरातील रोख रक्कम, महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले तसेच दरोडेखोरानी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे.

तरवडे वस्ती येथे रावसाहेब बापू तरवडे यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी घराच्या एका खोलीची बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर चोरटे रावसाहेब तरवडे यांच्या खोलीत घुसले. तरवडे यांना मारहाण करत त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम हिसकावून घेतली. रावसाहेब यांनी आरडाओरडा केली तेव्हा त्यांचा मुलगा मनोज यास जाग आली. मात्र त्याच्या खोलीची चोरट्यांनी कडी लावली होती. यावेळी मनोज याने चुलते व शेजारील राहणाऱ्या व्यक्तींस फोन करून माहिती दिली. शेजारचे लोक येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. रावसाहेब तरवडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या मारहाणीत जखमी असलेले रावसाहेब यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Rahuri Theft Home burglary one injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here