Home अहमदनगर वीज कर्मचाऱ्याने सर्व्हिस वायरने गळफास घेत संपविले जीवन

वीज कर्मचाऱ्याने सर्व्हिस वायरने गळफास घेत संपविले जीवन

Rahuri worker ended his life by strangling the service wire

राहुरी: राहुरी तालुक्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने सर्विस वायरने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. बसस्थानकासमोरील जिजाऊ चौकात फलँट मध्ये या कर्मचाऱ्याने दुपारी वाजता आत्महत्या केली.

संजय रंभाजी गावडे वय २४ रा. डिग्रस असे या मृत कर्मचारयाचे नाव आहे. गावंडे व महावितरणचे अन्य सहकारी भाड्याच्या फलँट मध्ये राहत होते. इतर कर्माचारी कामानिमित्त बाहेर गेल्याने गावंडेने पंख्याला सर्विस वायर बांधून गळफास घेत जीवन संपविले.

इतर कर्मचारी फलँटवर आले असता आतमधून काही एक प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता गावंडेने आत्महत्या केल्याचे दिसून आले. शवविचेद्नानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डिग्रस येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Rahuri worker ended his life by strangling the service wire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here