संगमनेर ब्रेकिंग: हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा
Sangamner Prostitution Business raid: नाशिक ते पुणे जाणारे हायवे परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पोखरी शिवारात सेक्स रॅकेट वेश्या व्यवसायावर डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकत पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.07/12/2022 रोजी डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business
एका महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी. संदीप मिटके, PI अरुण आव्हाड, ज्ञानेश्वर थोरात, चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.
Web Title: Raid on high profile prostitution business
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App