संगमनेरात मटका अड्ड्यांवर छापे, ८ जणांविरुद्ध गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: ठिकाणच्या मटका अड्ड्यांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी छापे टाकले. या छाप्यात सुमारे १० हजार रुपयांची रोकड व मटका साहित्य पोलिसांनी जप्त.
संगमनेर: संगमनेरात सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या मटका अड्ड्यांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी छापे टाकले. या छाप्यात सुमारे १० हजार रुपयांची रोकड व मटका साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
संगमनेरात राजरोसपणे मटका सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानु सार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी संगमनेरात दाखल होत मटका अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. नवघर गल्ली, अकोले नाका, जय जवान चौक, माळीवाडा, यशोदीप थिएटरच्या पाठीमागे घुलेवाडी येथे या पथकाने छापेमारी केली. या छाप्यात कल्याण मटका खेळतांना व खेळवितांना संतोष रुपचंद पवार (रा. नवघर गल्ली, संगमनेर), शुभम बाळू कालेकर (रा. संजय गांधी नगर, संगमनेर), धनंजय धनराज कतारी (रा. संजय गांधी नगर, संगमनेर), राजेंद्र बाबुलाल ओझा (रा. मेनरोड, संगमनेर) सिद्धांत रमेश जाधव (रा. यशोदीप थिएटर मागे, घुलेवाडी) हे मिळून आले तर शरद द्वारका शर्मा (रा. साईनाथ चौक, संगमनेर) हा फरार झाला आहे. या छापेमारीत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे यांनी सहभाग घेतला. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Raid on matka bases in Sangamner, crime against 8 persons
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study