Home क्राईम संगमनेरात पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांचा छापा, धक्कादायक प्रकार उघडकीस

संगमनेरात पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांचा छापा, धक्कादायक प्रकार उघडकीस

Sangamner Crime: कत्तलखान्यावर छापा (raid); गोमांस जप्त, एकास अटक.

Raid on Slaughterhouse Beef seized, one arrested

संगमनेर : शहर पोलिसांनी काल मध्यरात्री शहरातील जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले.

संगमनेर शहरातील अनधिकृत कत्तलखाने राज्यात कुप्रसिद्ध आहेत. शेकडोने छापे टाकून देखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. जमजम कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. त्यांनी या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात या कत्तलखान्याचा शोध घेत गेले असता एका ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात पोलीस कर्मचारी महादू किसन खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजीक रज्जाक शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहे.

Web Title: Raid on Slaughterhouse Beef seized, one arrested

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here