Home महाराष्ट्र Rain Alert: राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता

Rain Alert: राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता

rain with strong winds in the state for 2 days

मुंबई | Rain Alert: राज्यात तापमान चांगलेच वाढले आहे.  राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून वादळी वाऱ्याबरोबरच अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने २१ एप्रिलपासून २ दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्याबरोबरच पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये २१ एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्याबरोबरच तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा जास्त प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात देखील वादळी वाऱ्याबरोबरच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरामध्ये वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. -IMD

Web Title: rain with strong winds in the state for 2 days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here