जुलै महिन्यात राज्यात पावसाचा सर्वसाधारण अंदाज: हवामान विभाग
पुणे | Rain forecast in the state: राज्यात आणखी आठवडाभर तरी मोसमी पाउस जोर धरणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील देशात आणि राज्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाकडून ह्यावर्षी प्रथमच प्रत्येक महिन्यातील पावसाचा स्वतंत्र अंदाज व्यक्त होत आहे. गुरुवारी हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूजय महापात्रा यांनी जुलै मधील अंदाज जाहीर केला आहे. जुलै महिन्यात देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून दुसऱ्या आठवड्याच्या मध्यावर प्रमाण वाढणार आहे.
राज्यात कोकण विभागात सर्वत्र जुलै महिन्यात पाऊस सर्वसाधारण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागांत बहुतांश ठिकाणी सर्वसाधारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असली तरी काही भागांमध्ये या महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. देशाच्या वायव्य भागातील राज्यांसह दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी रहाणार आहे. मध्य भारतात काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाउस होण्याची शक्यता आहे.
Web Title: Rain forecast in the state in July Meteorological Department