Home अकोले Rain: अकोलेत बेमोसमी पावसाच्‍या रिमझिम सरी

Rain: अकोलेत बेमोसमी पावसाच्‍या रिमझिम सरी

Rains of unseasonal rain in Akole

अकोले | Rain Alert: हवामान विभागाने पावसाबाबत अंदाज वर्तविला होता. त्यानुसार अकोलेत  तसेच इतर लगत भागात काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. यानंतर सायंकाळच्या वेळी रिमझिम पावसाने (Rain) हजेरी लावल्याचे देखील दिसून आले आहे.

मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हवामान विभागाकडून  पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला होता. अंदाजानुसार आज अकोलेत पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून अकोलेत उष्णता वाढल्यामुळे नागरिकांना वाढलेल्या उष्णतेचा त्रास जाणवू लागला होता. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार ८ मार्च ते ११ मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरी शेतकऱ्याने या बेमोसमी पावसापासून नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान तज्ञांनी सांगितले आहे.

Web Title: Rains of unseasonal rain in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here