Home महाराष्ट्र ब्रेकिंग: राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

ब्रेकिंग: राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

Rana couple granted bail

मुंबई | Mumbai: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Rana couple granted bail) त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.  राणा दाम्पत्यांनी पुन्हा अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये तसेच माध्यमांना तिखट प्रतिक्रीया देऊ नये असे केल्यास पुन्हा जामीन रद्द होऊ शकतो असंही न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर केला आहे. १२ दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं  पठण करणारच असा इशारा देत अमरावतीमधून मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तसेच राणा यांच्या वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारी होती असं सांगत त्यांच्यावरती मुंबई पोलिसांनी कारवाई करीत अटक केली होती.

खासदार नवनीत रवी राणा यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. राणा यांच्या वकिलांनी त्यांना मणक्याचा त्रास असून त्यांच्या कमरेचे दुखणे वाढले असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचं कोर्टाला सांगितलं होतं.

Web Title: Rana couple granted bail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here