Home अकोले नवलेवाडी शाळेत रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी पालकांची गर्दी

नवलेवाडी शाळेत रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी पालकांची गर्दी

Breaking News | Akole News: शालेय जीवनात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहार.

Rangla Bal Anand Mela at Navlewadi School

नवलेवाडी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेवाडी येथे बाल आनंद मेळावा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थ आणि वस्तूंचे  स्टॉल्स लावले. विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक गुण विकसित करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य दिशेने विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याच्या संकल्पनेतून बाजाराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारणे अपेक्षित होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स लावून त्या वस्तू विकण्याचा प्रयत्न केला.

यातून सुरुवातीलाच सरांनी सांगितल्याप्रमाणे वस्तूसाठी आवश्यक असलेले भांडवल एका वहीवर लिहून ठेवण्यात आले. स्टॉलला भेट देणाऱ्या व विकत घेणाऱ्या गिऱ्हाईकांची माहिती सुद्धा नोंद करायला सांगितली होती. यातूनच दुपारपर्यंत जो काही विक्री होऊन फायदा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे याचा हिशोब विद्यार्थ्यांना करायला सांगितला होता. तो हिशोब विद्यार्थ्यांनी चोखपणे केला.

गावातील सर्व पालकांनी ग्रामस्थांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू, बनवलेल्या खाद्यपदार्थ यांचा मनसोक्त आनंद घेतला. यात सर्व मुलांनी आनंदाने सहभागी होऊन ऐनवेळी आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे प्रयत्नपूर्वक पालन केले. आपल्या अंगी असलेल्या कला मुलांनी सादर केल्या. अनेक मान्यवरांनी या बाल आनंद मेळाव्यास हजेरी लावली व सहभागी विद्यार्थ्यांचे व शाळेचे मनापासून कौतुक केले. असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भूमिका बजावत असतात असे मत पालकांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

पहा सविस्तरपणे व्हिडियो: 

यावेळी मुख्याध्यापिका विनयशीला शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांच्या विकासाबरोबरच  दैनंदिन व्यवहार त्यांना समजले पाहिजेत. व्यवहारीक जगाची त्यांना ओळख झाली पाहिजे यासाठी व एक सुजाण नागरिक घडविण्यासाठी बाल आनंद मेळावा घेण्यात  आला.

गटशिक्षण अधिकारी वाव्हळ साहेब, विस्तार अधिकारी हासे साहेब, केंद्रप्रमुख नरसाळे साहेब, मुख्याध्यापक विनयशीला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाजे सर, सदगीर सर जाधव मॅडम, जगताप मॅडम, डहाळे मॅडम, खतोडे मॅडम, काकड मॅडम, धिंदळे मॅडम व सर्व शिक्षकांनी या बाल आनंदमेळाव्याचे आयोजन केले होते.

Web Title: Rangla Bal Anand Mela at Navlewadi School

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here