Home अहमदनगर बाप लेकांनी मोल मजुरी करणाऱ्या महिलेवर वेगवेगळे आमिष दाखवून सलग ९ वर्ष...

बाप लेकांनी मोल मजुरी करणाऱ्या महिलेवर वेगवेगळे आमिष दाखवून सलग ९ वर्ष अत्याचार

Rape Case Baap Lek tortured a woman who was doing mercenary work

राहुरी | Rape Case: राहुरी येथील एका ३५ वर्षीय महिलेवर पारनेर तालुक्यातील बड्या घराण्यातील बाप लेकांनी वेगवेगळे आमिष दाखवून तसेच जबरदस्तीने सलग ९ वर्ष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात बाप लेकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी शहर येथे राहणारी एक 35 वर्षीय विवाहित महिला सन 2010 पासून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील संतोष भंडारी यांच्याकडे मोल मजुरीचे काम करण्यासाठी गेली होती. सदर महिला 2010 पासून ते 2019 पर्यंत भंडारी यांच्या घरी घरकाम करत होती. तर तिचा पती भंडारी यांच्या किराणा दुकानात मजुरीचे काम करत होता. सदर पती पत्नी त्यांच्या एका खोलीत राहत होते. काही दिवसांनी संतोष शांतिलाल भंडारी याने सदर महिलेला विविध प्रकारचे आश्वासन देऊन तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध केले.

हा सर्व प्रकार संतोष भंडारी याच्या मुलास  तो सदर ममाहिती झाला. तो महिलेला म्हणाला, तुझे व माझ्या वडिलांचे शारिरीक संबंध आहेत. माझ्याबरोबर देखील शारिरीक संबंध ठेव. नाहीतर हे सर्व प्रकार मी सगळ्यांना सांगेन. अशी धमकी देऊन त्यानेही सदर महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला.

संतोष भंडारी व राजेश भंडारी या बाप-लेकाकडून वारंवार होणार्‍या अत्याचाराला कंटाळून हा सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगणार आहे. असे सदर महिलेने त्यांना सांगितले. तेव्हा त्यावर त्या बाप -लेकांनी तू जर आमचे नाव कोठे घेतले किंवा कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर व तुझ्या पतीवर चोरी आणि इतर खोटे गुन्हे दाखल करून अडकवून टाकू, अशी धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार चालूच ठेवले.

बाप-लेकाच्या अत्याचाराला कंटाळून सदर महिला व तिचा पती टाकळी ढोकेश्वर सोडून राहुरीत आले. दरम्यान सदर महिलेने 15 मार्च 2021 रोजी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शांतिलाल भंडारी व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी दोघे रा.टाकळीढोकेश्वर, तालुका पारनेर या बाप-लेका विरोधात वारंवार बलात्कार करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  सदर गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक तपास पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले हे करीत आहेत.  

Web Title: Rape Case Baap Lek tortured a woman who was doing mercenary work

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here