Home अहमदनगर धक्कादायक: स्वतःच्या मुलीवर पित्याचा अत्याचार

धक्कादायक: स्वतःच्या मुलीवर पित्याचा अत्याचार

Rape Case Father's oppression of his own daughter

अहमदनगर | Rape: नगर शहरातील एका उपनगरात धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीचे काम करणाऱ्या पित्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पित्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परप्रांतातून नगरमध्ये कामासाठी आलेल्या या व्यक्तीने राहत्या घरात स्वतः च्या मुलीवर अत्याचार केला आहे.

पतीच्या या कृत्याची माहिती समजल्यानंतर पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Rape Case Father’s oppression of his own daughter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here