Home अमरावती Rape | धक्कादायक! मुलीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन सामुहीक अत्याचार  

Rape | धक्कादायक! मुलीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन सामुहीक अत्याचार  

Rape Case Mass atrocities against a girl by giving her a narcotic

Amaravati | अमरावती: महिला अत्याचारांच्या घटनांत काही दिवसांपासून वाढ होत आहे. याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.   अशातच अमरावतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.  अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.

पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १२ जूनच्या रात्रीला तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर आरोपींनी चारचाकीमध्ये पिडीतेवर सामुहिक अत्याचार केला.

दरम्यान, या घटनेनं पीडित मुलगी प्रचंड घाबरली. भेदरलेल्या परिस्थितीत तिने परतवाडा पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून  याबाबत  अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Rape Case Mass atrocities against a girl by giving her a narcotic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here