Home क्राईम अल्पवयीन मुलीवर बलात्कार गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग

अल्पवयीन मुलीवर बलात्कार गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग

Rape Case:  एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक.

Rape Case Minor girl sexual harassment in Daund A woman was also involved in the crime

दौंड : दौंड शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ओंकार जोगदंड ( रा. दौंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात एका महिलेचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरी असताना आरोपी ओंकार तसेच एक नातलग महिला तेथे आली दरम्यान त्यांनी अल्पवयीन मुलीला कशाची तरी फूस लावून पळवून नेले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरी आली असता, तिच्या आईने तिला विचारले की, ओंकार व संबंधित महिलेने तुला कोठे नेले होते? तेव्हा तिने सांगितले की, त्यांनी मला त्यांच्या घरी नेले व ओंकार याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून शारीरिक सुखाची मागणी केली.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

त्यास नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली. पीडित मुलीने पुढे सांगितले की, ऑगस्ट २०२२ मध्ये आरोपीने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर दोन ते तीन वेळा अत्याचार केला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

Web Title: Rape Case Minor girl sexual harassment in Daund A woman was also involved in the crime

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here