Home क्राईम Rape Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape Case Sexual abuse of a minor girl

बीड | Rape Case: बीडच्या परळी तालुक्यातील नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual abusing) केल्याची घटना समोर आली आहे. म्हशीला चारापाणी टाकण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर, गावातीलचं एका नराधमाने लैगिंक अत्याचार केला आहे. याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत मुलीने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी, शेतात म्हशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. त्यापैकी दोघेजण तिथुन निघून गेले व एक जण तिथेच थांबून राहिला व यावेळी त्याने ” तू मला आवडते म्हणत बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध (Rape) प्रस्थापित केले. “. तसेच हे कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी आरोपी अंकुश गायके याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape Case Sexual abuse of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here