Home अहमदनगर महिलेवर अत्याचार करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षकास अखेर अटक

महिलेवर अत्याचार करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षकास अखेर अटक

अहमदनगर | Rape Case: एका महिलेवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात फरार व निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ यास मोठ्या शिथाफिने तोफखाना पोलीस पथकाने नाशिक येथे पकडले आहे.

निलंबित वाघ हा गेल्या तीन महिन्यापासून पसार होता. वाघ विरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश देत पोलिसांच्या विशेष पथकाने मोबाईल लोकेशनद्वारे नाशिक येथे त्यास अटक केली आहे.

तो नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सुरज मेढे, हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप यांच्या पथकाने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचत सकाळी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.  

Web Title: Rape Case Suspended police inspector arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here