नात्याला काळिमा! वासनांध मामाचा भाचीवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Crime News: बहिणीकडे आलेल्या नराधमाने तिच्याच घरी भाचीवर शारीरिक अत्याचार (Rape).
बुलढाणा: बुलढाणा येथून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीकडे आलेल्या नराधमाने तिच्याच घरी भाचीवर शारीरिक अत्याचार (abused) केले. सर्वसामान्यांना चीड आणणारी ही घटना खामगाव शहरात घडली. पुणे येथील रहिवासी असलेला हा चाळीस वर्षीय नराधम खामगाव येथे राहत असलेल्या बहिणीला भेटावयास आला होता. भाऊ (आणि मामा) आल्यामुळे दोघी मायलेकी आनंदी झाल्या.
मात्र, त्यांना वासनांध पाहुण्याच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता नव्हता. दरम्यान, रात्रीच्या वेळी नराधम मामाने भाचीवर अत्याचार केला. त्यानंतर तो पसार झाला. मुलीने आईला हकीकत सांगितली. यामुळे तिला धक्काच बसला. मातेने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पोस्को कायद्याच्या कलम ४,६,८ आणि भादंविच्या कलम ३७६ अ, ३७७, ३७६ आय नुसार गुन्हा दाखल केला. नराधम मामास अकोला येथून अटक करण्यात आली आहे.
Web Title: Rape Case uncle abuses niece The police beat
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App