Home क्राईम Rape Case: घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार

Rape Case: घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार

तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने संधी साधली, शेजारच्या तरुणाने धमकी देत वारंवार अत्याचार (Rape) केल्याची घटना.

Rape of young woman taking advantage of being alone at home

कल्याण: कल्याणमध्ये घरात एकटी असलेल्या तरुणीवर शेजारच्या तरुणाने धमकी देत वारंवार अत्याचार (Sexual abused) केल्याची घटना समोर आली आहे. ज्यावेळी हे सगळं प्रकरण तरुणीने तिच्या बहिणीच्या कानावर घातलं, त्यावेळी तरुणीच्या बहिणीने थेट पोलिस स्टेशन गाठत तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी  त्या तरुणाला काही तासांच्या आतमध्ये ताब्यात घेतलं. सागर गाडे असं त्या तरुणाचं नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने संधी साधली आहे. त्याचबरोबर याची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणीही कल्याण पूर्वेत आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. तीन वर्षांपूर्वी या पीडीत तरुणीने दहावीच्या परीक्षेचं टेन्शन घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. औषध उपचारानंतर तिची तब्येत सुधारत चालली होती. काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडित तरुणी घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरड केल्याने तो तेथून निघून गेला. मात्र त्यानंतर पुन्हा आरोपीने पीडितेला धमकावत तिच्या घरात घुसून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. मात्र नंतर आरोपी पीडित तरुणी घराबाहेर पडली, तर तिची भर रस्त्यात छेड काढत तिच्या सोबत अश्लील चाळे करू लागला. अखेर या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. यानंतर पीडितेच्या बहिणीने पीडीत तरुणीला घेऊन मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape of young woman taking advantage of being alone at home

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here