Home क्राईम सोशियल मेडीयाच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

सोशियल मेडीयाच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

Pune Crime News:   युवतीला हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना.

Rape of young woman through social media acquaintance

पुणे: सोशियल मेडीयाच्या ओळखीतून एका युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संभाजीनगरमधील युवकास अटक केली. फैजल दादामिया पठाण (वय १९, रा. बडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत एका युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फैजल आणि युवतीची समाजमाध्यमातून ओळख झाली होती.

फैजलने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फैजल पुण्यात आला. त्याने युवतीला हडपसर भागातील एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीवर त्याने संशय घेण्यास सुरुवात केली. युवतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्याने तिला त्रास दिला.

युवतीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने युवतीला स्वारगेट भागात भेटण्यास बोलावले. युवतीला मारहाण करून त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.

Web Title: Rape of young woman through social media acquaintance

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here