Home अहमदनगर संगमनेरातील रावण दहन सोहळा व भगवान गडावरील दसरा मेळवा रद्द

संगमनेरातील रावण दहन सोहळा व भगवान गडावरील दसरा मेळवा रद्द

Ravan Dahan ceremony at Sangamnera and  Bhagwan Gada canceled

संगमनेर: मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रोड वरील सीमोल्लंघनाला शतकाची परंपरा आहे. विजयादशमीला शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरचे नागरिक मोठी गर्दी करतात. ह्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर सीमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती मालपाणी उद्योग समुहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या सूचनेवरून हा निर्णय घेतला आहे. कोविडचा पराभव करण्यासाठी दसराच्या दिवशी घरात राहूनच महापूजा करावी, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भगवान गडावरील सीमोल्लंघन सोहळा व दसरा मेळावा यंदा रद्ध करण्यात आला आहे. करोनावर लस येईपर्यंत गडाचे महाद्वार खुले राहणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ravan Dahan ceremony at Sangamnera and Bhagwan Gada canceled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here