Home संगमनेर संगमनेर: लग्न समारंभाला जातांना दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

संगमनेर: लग्न समारंभाला जातांना दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

Sangamner Road Accident:  लग्न समारंभाला  जात असतांना दुचाकीवरुन चक्कर येऊन खाली रोडवर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना.

Road Accident woman died after falling from a bike while going to a wedding ceremony

संगमनेर:  लग्न समारंभाला  जात असतांना दुचाकीवरुन चक्कर येऊन खाली रोडवर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव जवळ येवले फाटा येथे घडली आहे. गंगूबाई सुर्यभान कोहकडे ( वय ५७ रा.घुलेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, किसन बाबुराव कोहकडे हे गंगूबाई यांना दुचाकीवरुन संगमनेर येथून धांदरफळ याठिकाणी लग्नासाठी घेवून जात होते निमगाव जवळच असलेल्या येवले फाटा येथे आले असता त्याच दरम्यान गंगूबाई यांना चक्कर आली आणि त्या दुचाकीवरुन खाली रोडवर पडल्या त्यांना तातडीने औषधोपचारासाठी संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच गंगूबाई कोहकडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किसन बाबुराव कोहकडे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

Web Title: Road Accident woman died after falling from a bike while going to a wedding ceremony

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here