Home क्राईम कारमधून फिरणाऱ्या नग्न साधूने दोघांना लुटले- Robbed

कारमधून फिरणाऱ्या नग्न साधूने दोघांना लुटले- Robbed

Nashik Robbed Case: पांढऱ्या रंगाच्या कारमधून फिरणाऱ्या नग्न (Naked) साधूने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना लुटल्याचा प्रकार समोर.

robbed by a naked monk traveling in a car

नाशिक: नाशिकमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारमधून फिरणाऱ्या नग्न साधूने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन घटनेने खळबळ उडाली आहे.

घडलेली पहिली घटना अशी की,  म्हसरूळ हद्दीतील किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली. भगीरथ रामचंद्र शेलार (६९, रा. शिवाजीनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) यांनी फिर्याद दिली., गेल्या मंगळवारी (ता.२३) सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गाने मॉर्निंग वॉक करीत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारचालकाने त्र्यंबककडे जाण्याचा रस्ता विचारला.

त्यावेळी कारमध्ये असलेल्या नग्न साधूने शेलार यांना आशीर्वाद देण्याचे बहाण्याचे जवळ बोलाविले आणि शेलार यांच्या गळ्यातील ३५ हजारांची सोन्याची चैन बळजबरीने खेचून पोबारा (Robbed) केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

घडलेली दुसरी घटना अशी की,  मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावणे सात वाजेच्या सुमारास अशाप्रकारे घडली. उत्तम रामचंद्र परदेशी (७५, रा. योगेश्‍वर नगर, गोविंद नगर लिंकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास गोविंदनगरला ऋषी हॉटेलजवळ मॉर्निंग वॉक करीत होते.

त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एकाने पंचवटीकडे जाण्याचा रस्ता विचारला. यावेळी कारमध्ये एका नग्न साधूसमवेत एक महिला व इसमही होता. त्यावेळी नग्न साधूने परदेशी यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनमध्ये रुद्राक्ष बसूवन देतो.

त्यामुळे तुमचे कल्याण होईल असे आमिष दाखवून कारमध्ये बसवून इंदिरानगर बोगद्याकडे नेले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून संशयितांनी त्यांची चैन परत न करता फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी हे तपास करीत आहे.

Web Title: robbed by a naked monk traveling in a car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here