Home संगमनेर संगमनेरात खा. लोखंडे; शिवसेनेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

संगमनेरात खा. लोखंडे; शिवसेनेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Sangamner News: शहरप्रमुख कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांना संध्याकाळी सहापर्यंत ताब्यात.

Sadashiv Lokhande entry in Sangamner Shiv Sena officials in police custody

संगमनेर: मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात सहभागी न झाल्यानंतर न शिवसैनिकांनी निषेध करत त्यांच्या फलकाला काळे फासले होते. ‘खासदार सदाशिव लोखंडे यांनी पोलीस संरक्षणाशिवाय संगमनेरात ड फिरून दाखवावे’, असा इशारा शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला होता. गुरुवारी (दि. १) खासदार लोखंडे संगमनेरात आल्याने पोलिसांनी शहरप्रमुख कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांना संध्याकाळी सहापर्यंत ताब्यात घेतले होते.

येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासंदर्भात खासदार लोखंडे यांनी बैठक घेतली. ते येणार असल्याने शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी सीआरपीसी १४९ प्रमाणे शहरप्रमुख कतारी यांना नोटीस बजावली होती. कतारी आणि  उपजिल्हाप्रमुख हासे यांना सकाळीच ताब्यात घेतले. सार्वजनिक शांततेस तसेच कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही. त्या अनुषंगाने ही नोटीस बजावली होती. खासदार लोखंडे संगमनेरातून गेल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांना सोडून दिले.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणा हाताशी धरली. माझ्यावर आणि माझे सहकारी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची प्रतिबंधात्मक कारवाई केली. आम्हाला दिवसभर एकाच ठिकाणी पोलीस ठाण्याजवळ बसवून ठेवले, हे चुकीचे आहे. संगमनेरातील आपण खरोखर जनतेच्या मनातील खासदार असाल, लोकभावना विचारात घेऊन शिंदे गटात गेलात, तर आपल्याला पोलीस बळाचा वापर करायची गरज काय? आपण निर्भीडपणे संगमनेरमध्ये फिरून दाखवाच. संगमनेरची जनता तुम्हाला घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस संरक्षणाशिवाय फिरून दाखवा, मग कळेल.

– अमर कतारी, शिवसेना शहरप्रमुख, संगमनेर

Web Title: Sadashiv Lokhande entry in Sangamner Shiv Sena officials in police custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here