Home पुणे धक्कादायक! सक्ख्या काकानेच केला दोन अल्पवयीन पुतणींवर बलात्कार, नात्याला काळीमा फासणारी घटना...

धक्कादायक! सक्ख्या काकानेच केला दोन अल्पवयीन पुतणींवर बलात्कार, नात्याला काळीमा फासणारी घटना  

Pune Crime News: सक्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतणींवर बलात्कार (Rape) केल्याची घटना.

Sakhya uncle rape two minor nephews 

पुणे : सक्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतणींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सख्ख्या काकानेच दोन  अल्पवयीन पुतणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भवानी पेठेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 इरफान आतिक (29) आणि मोहम्मद धोबी (40) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  हा सगळा प्रकार गेल्या 20  ते 22 दिवसांपासून सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय 14 असून दुसऱ्या पीडित मुलीचे वय 10 असून त्या दोघी बहिणी आहेत. या दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. मुली लहान असल्या कारणाने त्यांनी या दोघींना काकाकडे राहिला पाठवले होते. दरम्यान घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याच्या मित्रानेसुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेनं सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघही जणांना अटक केली आहे. खडक पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे तर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Sakhya uncle rape two minor nephews 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here