Home महाराष्ट्र बलात्कारी आणि खुनी आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करताच नराधम ढसाढसा रडू लागला

बलात्कारी आणि खुनी आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करताच नराधम ढसाढसा रडू लागला

Sakinaka Rape-Murder Case

Sakinaka Rape-Murder Case :  मुंबईतल्या अंधेरी  येथील साकीनाका बलात्कार आणि हत्या दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा करून राज्य सरकारनं आरोपी मोहन चौहानला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली असता नराधम आरोपी ढसाढसा रडू लागला आणि शिवीगाळ करू लागला. या प्रकरणात आरोपीनं बलात्कारानंतर पीडितेवर केलेल्या निर्घृण हल्ल्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयानं आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं आहे. त्याच्या शिक्षेबाबत दिंडोशी न्यायालय आज निर्णय सुनावणार आहे. पीडितेच्या दोषीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. गणेश चतुर्थीच्याच दिवशी हा प्रकार घडला होता.  याप्रकरणातील नराधम आरोपी मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून काल (1 जून 2022) मोहनच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला.

घटनेबाबत:

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपला जीव सोडला.

Web Title: Sakinaka Rape-Murder Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here