Home बुलढाणा समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू

Samruddhi highway Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू.

Samruddhi highway Bus Accident 25 Death

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूचअसून आज रात्री पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली आहे. . समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजां परिसरात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. आधी ही बस डिव्हाइडरला धडकली. नंतर लोखंडी पोलवर आदळून बस उलटली. यानंतर बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. अधिकतर प्रवाशी यवतमा वर्धा नागपूर येथील होते. अपघातानंतर ८ प्रवासी खिडकीच्या काचा फोडून बाहेर आल्याने सुखरूप वाचले. घटनास्थळी पोलिस पथक तातडीने दाखल झाले आहेत. पोलिसांनी 25 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती दिली आहे.

नागपूरहून निघालेली ही बस बुलढाण्यातील सिंदखेड राजा भागात पिंपळखुटा येथे 1 वाजून 26 मिनिटांनी हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुरुवातीला लोखंडी खांबावर आदळली. नंतर डिव्हायडरला धडकली त्यानंतर उलटली. दरम्यान यामुळे बसचा डिझेल टैंक फुटला आणि बसने पेट घेतला. आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले आणि भीषण अनिल सुरू झाले. यातील काही प्रवासी काच फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने सुखरूप बचावले.

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.

Web Title: Samruddhi highway Bus Accident 25 Death

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here