Home औरंगाबाद ‘समृद्धी’ महामार्गावर गाडी उभी करून तरुणाचा हवेत गोळीबार

‘समृद्धी’ महामार्गावर गाडी उभी करून तरुणाचा हवेत गोळीबार

Samruddhi Highway Firing:  एकाने हवेत गोळीबार करून व्हिडीओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

Samruddhi Highway Firing crime filed

औरंगाबाद: तुफान वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एकाने हवेत गोळीबार करून व्हिडीओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

ही भाईगिरी त्याच्या चांगलीच अंगलट आली असून, पोलिसांनी बुधवारी (दि. १४) फुलंब्री ठाण्यात बाळू गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सायबर पोलिस व गुन्हे शाखा त्याच्या मागे लागली आहे. अटक केल्यावरच नेमका प्रकार लक्षात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. औरंगाबादेतील बाळू गायकवाड नावाच्या कार्यकर्त्याने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने (एम. एच २० एफजी २०२०) समृद्धी महामार्ग गाठला. हर्सल सावंगीजवळील बोगद्याजवळ त्याने कारच्या समोर उभे राहून हवेत गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ बनविला.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

हवेत गोळीबार केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जिवंत काडतुसाने ही फायरिंग केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Samruddhi Highway Firing crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here